Mumbai Bharti 2024: राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास थेट खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी दिलेल्या तारखेस उपस्थित राहायचे आहे.
पदांचा तपशील
भौतिकोपचार तज्ञ
नोकरीचे ठिकाण
मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्र
शैक्षणिक अर्हता
उमेदवाराला संगणक हाताळण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे, भौभौतिकोपचार मधील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक.
पगार (Mumbai Bharti 2024)
या भरती प्रक्रियेमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा पगार हा 20000 रुपये तसेच अधिक प्रवास भत्ता 2700 देण्यात येणार आहे.
वयोमर्यादा
यामध्ये अर्ज करणारे उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे असावे (मागासवर्गीयांना पाच वर्षाची सूट देण्यात आलेली आहे)
निवड प्रक्रिया
उमेदवाराची निवड थेट मुलाखती द्वारे होणार आहे.
मुलाखतीची तारीख
23 जुलै 2024
मुलाखतीचा पत्ता (Mumbai Bharti 2024)
सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) मुंबई कार्यालय, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय (ई. एस. आय.एस हॉस्पीटल) नर्सेस क्वार्टर्स, २ रा मजला, एल.बी.एस. मार्ग, मुलुंड (पश्चिम) मुंबई – 400080
आवश्यक कागदपत्रे
- शैक्षणिक अर्हते बाबतचे प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
- शाळा सोडल्याचा दाखला/जन्म तारखेचा दाखला
- प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचे दोन फोटो
- शासकीय अनुभव असल्यास अनुभव दाखला
उमेदवारांसाठी अटी व शर्ती
- जाहिरातीतील पद राज्य शासनाचे नियमित पदे नसून निवडक कंत्राटी स्वरूपाचे असणार आहे.
- अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदाराविरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
- अनुभवी व उच्च शैक्षणिक अहर्ताधारकास प्राधान्य दिले जाईल.
- भरती प्रक्रिया स्थगित करणे/ रद्द करणे, पदभरतीत बदल करण्याचे सर्व अधिकारी NHM Mumbai Recruitment 2024 या कार्यालयास तसेच माननीय अध्यक्ष जिल्हा कुष्ठरोग समिती तथा कार्यकारी आरोग्य अधिकारी बृहन्मुंबई म.न.पा यांचे स्तरावर राखून ठेवण्यात आलेले आहेत.
- दिलेल्या तारखेनंतर मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार नाही, मुलाखतीतील अटी-शर्ती नियम बाबतीत शिथिल करण्याचे अधिकार समितीने राखून ठेवलेले आहेत त्यामुळे पदांमध्ये गरजेनुसार बदल होऊ शकतो.
जाहिरात: डाउनलोड करा