MSRTC Bhandara Bharti : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भंडारा अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत, इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने 16 जुलै 2024 पूर्वी हे अर्ज सादर करायचे आहेत.
पदांचा तपशील
- यांत्रिक मोटार गाडी एमएमसी – 110 जागा
- विजतंत्री इलेक्ट्रिशन – 24 जागा
- ऑटो इलेक्ट्रिशन – 04 जागा
- पत्रा कारागीर – 18 जागा
- वेल्डर – 16 जागा
- रंगारी (पेंटर) – 10 जागा
- यांत्रिकी – 10 जागा
- कातारी – 03 जागा
- डिझेल मेकॅनिक – 36 जागा
शैक्षणिक पात्रता
दहावी उत्तीर्ण आयटीआय दोन वर्षाचा संबंधित विषयातील अभ्यासक्रम परीक्षा पास किंवा व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाचे वोकेशनल अभ्यासक्रम पूर्ण केलेले उत्तीर्ण विद्यार्थी अर्ज करू शकतील
वयोमर्यादा (MSRTC Bhandara Bharti)
दिनांक 08 जुलै 2024 रोजी उमेदवाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा जास्त नसावे मागासवर्गीयांसाठी वयोमर्यादेमध्ये पाच वर्षे शिथिलता ठेवण्यात आलेले आहेत त्याकरिता शासनाच्या सुधारित नमुन्यातील 1995 नंतरची दाखल्याचे प्रमाणित केलेले छायांकित प्रत, जातीच्या प्रमाणपत्राची छायांकित प्रत सादर करावे.
अर्जाचे शुल्क
विहित नमुन्यातील राष्ट्रीय परिवहन महामंडळाचे छापील अर्ज विभागीय कार्यालयात राज्य परिवहन भंडारा MSRTC Bhandara Bharti येथून घ्यावे लागतील. त्यासोबत मागासवर्गीय उमेदवार असल्यास अनुसूचित जाती जमातीसाठी फक्त 296 शुल्क असेल तसेच खुला व इतर प्रवर्गासाठी 590 एवढे शुल्कअसेल याचा डीडी एमएसआरटीसी फंड अकाउंट भंडारा या नावाने काढून हे अर्ज जमा करायचे आहेत.
अर्ज करण्याची पद्धत
शिकाऊ उमेदवारांचे विहित राष्ट्रीय परिवहन नमुनेतील अर्ज दिनांक 08 जुलै 2024 ते 16 जुलै 2024 पर्यंत सकाळी 11.00 ते 3:00 वाजेपर्यंत शनिवार,रविवार व सुट्टीचे दिवस वगळून या कार्यालयातून दिले जातील. तसेच परिपूर्ण भरलेल्या अर्ज 16 जुलै 2024 रोजी संध्याकाळी सात वाजेपर्यंत स्वीकारले जातील त्यानंतर आलेल्या अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. प्रशिक्षण पूर्ण केलेला उमेदवारांना राष्ट्रीय परिवहन महामंडळामध्ये सामावून घेण्याची जबाबदारी राष्ट्रीय परिवहन महामंडळावर राहणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
आवश्यक कागदपत्र (MSRTC Bhandara Bharti)
अर्जासोबत अप्लाय केल्याची प्रत, आधार कार्ड, औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रमाणपत्र, जन्मतारखेकरिता शाळा सोडल्याचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र व इतर आवश्यक प्रमाणपत्राच्या साक्षांकित केलेल्या छायांकित प्रति सोबत जोडणे आवश्यक असेल.
उमेदवारासाठी सूचना
- शिकाऊ उमेदवारी साठी निवड झालेल्या उमेदवारांच्या प्रशिक्षण सुरू होण्यापूर्वी त्यांचे वैद्यकीय तपासणी करण्यात येईल व त्यात पात्र ठरणाऱ्या उमेदवारांचे राष्ट्रीय परिवार महामंडळाचे करार केल्यानंतर त्यांना शिकाऊ उमेदवारी कायदा नुसार करून घेण्यात येईल.
- जर करार झाला नाही तर शिकाऊ उमेदवारी दावा राहणार नाही याची नोंद घ्यावी MSRTC Bhandara Bharti तसेच उमेदवाराने करार कालावधी शिकाऊ उमेदवारी पूर्ण करणे आवश्यक आहे.
- उमेदवारांच्या शिकाऊ उमेदवार म्हणून निवड झाल्यास नेमणूक उमेदवारांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर त्यांना राज्य परिवह महामंडळाचे सहाय्यक पदांमध्ये अथवा कायमस्वरूपी सेवेसाठी कुठले आधार घेता येणार नाही किंवा प्रशिक्षण पूर्ण केले या आधारे सेवेस सामावून घेण्याची बंधन राष्ट्रीय परिवहन महामंडळ राहणार नाही याबाबत प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल.
- सदर शिकाऊ उमेदवार भरती बाबतचे सर्व हक्क राज्य परिवहन महामंडळाकडे अबाधित राहतील.
मूळ जाहिरात : डाऊनलोड करा