वनविभागाच्या नियोजनशुन्य कारभाराचे बळी ठरले शेतकरी व शालेय विद्यार्थी…

रानडुकराच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यु तर शालेय विद्यार्थी सह सहा जण गंभीर जखमी…

सावली तालुक्यातील कवठी येथे सकाळी १०.३० वाजता शेतीत काम करणाऱ्या शेतकरी बांधवां वर रानडुक्करांने हल्ला केला. हल्ल्यात आनंदराव नामदेव चौधरी रा.सावली यांचा मृत्यु झाला असून सुरेश आकुलवार, निर्मला आकुलवार, स्वप्नील आकुलवार शेतकरी व तन्नु नायबनकर, केशवी पाल, दुर्गा दहेलकार या शालेय जखमी झाले आहे. एकाच दिवसात रानडुक्करांने सात लोकांवर हल्ला केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या शेतीचा हगांम सुरू असून मोठ्या प्रमानावर शेतीची कामे सुरू असल्याने मजुरांचा तटवडा आहे अश्यास्थीती मध्ये सावली परिसरात व जिल्ह्यात अनेक ठिकाणी रानडुक्कर व हिंस्र वन्यप्राण्यांच्या मानवा वरील हल्ल्याच्या घटनान मध्ये लक्षणीय वाढ झाली असल्याने शेतीचे कामे प्रभावीत झाली आहे. अनियमित पाऊस व शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने आधीच शेतकरी हवादील झाला आहे. एकीकडे नैसर्गिक आपत्ती तर दुसरी कडे वन्यप्राण्याचे हल्ले अश्या दुहेरी संकटात सापडलेला जगाचा पोशिंदा शेतकरी पुर्ण पणे हतबल झाला आहे.

वनविभाग हजारो कोटी रुपयाची उधळपट्टी करून उद्यान निर्माण करने, बिनकामाच्या इमारती निर्माण करने, व्याघ्र प्रकल्पाच्या नावा खाली श्रीमंताचे होटेल व्यवसाय मोठे करने याला विकासाचे गोंडस नाव देत जनतेची दिशाभूल करित असून वनविभागाने उद्यान व इमारती निर्माण करण्याची कामे तात्काळ थांबवून मानवावरिल वन्यप्राण्याचे होणाऱ्या हल्ले कमी करण्या करिता उपाययोजना करून मानव-वन्यजीव संघर्ष थांबवीण्याचे काम करावे ही मागणी जनते कडून होत आहे.

रानडुक्करांच्या हल्लयात एक शेतकरी मृतपावले तर तीन शेतकरी व तीन शालेय विद्यार्थी गंभीर जखमी झाले त्याबद्दल डॅा. अभीलाषा गावतुरे यांनी शोक व्यक्त केला आहे. जिल्ह्यात सातत्याने शेतकरी जनतेवर वन्यप्राणी हल्ले होत असून मानव-वन्यजीव संघर्ष थांबवीण्यास वनविभाग अयशस्वी झाले असल्याने या घटनेची जबाबदारी वनविभागाने स्वीकारावी अशी मागणी केली. त्यांनी सांगितले की, वन्यप्राण्या द्वारे गरिब जनतेवर होणाऱ्या हल्ल्या बाबत वनविभागाने यशस्वी नियोजन केले पाहिजे पण असे करतांना वनविभाग दिसत नाही. वनविभागाच्या चुकीच्या नियोजनांची फळे जनतेला जिव देऊन चुकवावी लागत असल्याची खंत या हल्ल्यातील जखमींना भेटल्या नंतर त्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *