PMC Recruitment 2024: पुणे महानगरपालिकेमध्ये विविध पदासाठी भरतीचे जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने 08 जुलै 2024 पासून 16 जुलै 2024 पर्यंत सकाळी 10.00 ते 2.00 या वेळेत विहित नमुन्यात अर्ज सादर करायचे आहेत.
पदांचा तपशील
- फ्रिज एससी दुरुस्ती प्रशिक्षक – 01 जागा
- चार चाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षक वर्ग सहाय्यक – 01 जागा
- कॅम्पुटर टायपिंग प्रशिक्षक – 01 जागा
- इंग्रजी संभाषण कला प्रशिक्षक – 03 जागा
- जेंट्स पार्लर बेसिक व ॲडव्हान्स प्रशिक्षक – 01 जागा
- संगणक प्रशिक्षक – 01 जागा
- संगणक बेसिक (एमएससीआयटी, टॅली,डीटीपी) प्रशिक्षक – 04 जागा
आवश्यक पात्रता
- फ्रिज एसी दुरुस्तीचा डिप्लोमा शासनमान्य आयटीआय उत्तीर्ण
- चार चाकी वाहन दुरुस्तीचा किमान सहा महिने कालावधीचे प्रशिक्षण उत्तीर्ण
- इयत्ता बारावी उत्तीर्ण व शासकीय टंकलेखन परीक्षा इंग्रजी 60 शब्द प्रतिमिनिट, मराठी 40 शब्द प्रतिमिनिट व हिंदी 40 शब्द प्रतिमिनिट उत्तीर्ण तसेच एमएससीआयटी उत्तीर्ण.
- बीए, एमए (इंग्लिश)
- ब्युटी पार्लर प्रशिक्षण उत्तीर्ण
- इलेक्ट्रॉनिक
- बीसीए, एमसीए, बीसीएस, एमसीएस, एमसीएम, आयटी
अनुभव (PMC Recruitment 2024)
विविध पदासाठी अनुभव वेगवेगळ्या दर्शवण्यात आला असून कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव संबंधित पदांसाठी आवश्यक असणारा आहे तर उमेदवाराने अर्ज करण्या अगोदर जाहिरात व्यवस्थितरित्या वाचावी व त्यानंतर अर्ज सादर करावा.
अर्ज करण्याचा कालावधी
उमेदवाराने 08 जुलै 2024 पासून 16 जुलै 2024 सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत टपालने आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही. तुम्हाला अर्ज तिथे स्वतः जाऊन करावे लागणार आहेत.
अर्ज जमा करण्यासाठी पत्ता
एस एम जोशी हॉल, 582 रास्ता पेठ, टिळक आयुर्वेद कॉलेज शेजारी, पुणे – 11 या ठिकाणी विविध नमुन्यात अर्ज सादर करायचे आहेत.
आवश्यक कागदपत्रे
अर्जासोबत एक पासपोर्ट आकाराचा फोटो, शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक पात्रतेचे दाखले, अनुभवाचा दाखला व इतर आवश्यक कागदपत्र साक्षांकित करून व पानवारी म्हणजे पेजिंग करून अर्ज सोबत जोडायचे आहे.
उमेदवारासाठी सूचना (PMC Recruitment 2024)
- अर्जामध्ये संपूर्ण माहिती दिलेली नसल्यास तसेच अर्जासोबत उपरोक्त नमूद दाखल्याच्या प्रतीत जोडलेले नसल्यास सदरच्या अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्जासोबत दिलेली माहिती व मुळे कागदपत्रात काही दिवसांकडे अशा नेमणूक बाद करण्यात येतील.
- निवड झालेल्या उमेदवारास स्वखर्चाने करार करून घ्यावा लागेल.
- निवड प्रक्रियेच्या अंतिम अधिकार माननीय उपायुक्त पुणे महानगरपालिका पुणे याने राखून ठेवले आहेत.
- अपात्र ठरलेल्या उमेदवाराच्या बाबतीत कोणते पत्र व्यवहार केला जाणार नाही.
- निवड झालेल्या उमेदवारास सेवेत रोजण्यापूर्वी एका बॅचचे मानधन आणि मात्र म्हणून भरावे लागेल त्यावर कोणत्याही प्रकारचे व्याज मिळणार नाही.
मूळ जाहिरात : डाऊनलोड करा