वरदा महाजन
बीबीसी माझा, नांदेड
अतिशय जीर्ण झालेल्या व धोकादायक बनलेल्या धर्माबाद येथील पोलीस क्वार्टर नवीन इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून प्रामाणिक प्रयत्न करेन असे ठोस आश्वासन आमदार राजेश पवार यांनी धर्माबाद पोलीस ठाण्यामध्ये पोलीस मित्रांना दिले.
आमदार राजेश पवार हे काल धर्माबाद तालुक्याच्या दौऱ्यावर होते. आपल्या निधीतून होत असलेल्या विकास कामावर कटाक्षाने नजर टाकत ते येताळा बाभूळगाव अशी गावे करत धर्माबाद पोलीस ठाण्यामध्ये आले.पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रावसाहेब रोकडे यांनी त्यांचे विशेष स्वागत करून धोकादायक बनलेल्या पोलीस क्वार्टर बद्दल माहिती दिली. आमदार राजेश पवार यांनी क्षणाचाही विलंब न लावता सदरील कामे कुणाच्या माध्यमातून प्रस्तावित करता येतात याची जाणकारी लगेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राम गलधर यांच्याकडून घेतली. व थेट राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून याबाबत तातडीने निधी कसा मिळवता येईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन असे आश्वासन दिले. यामध्ये जुनी इमारत डिमालीश करून त्या जागी नवीन आद्ययावत इमारत बांधणे,ततद्वतच शांतता समितीची बैठक वारंवार घेण्यासाठी छोटा खाणी हॉल उपलब्ध करणे यासाठी तात्काळ इस्टिमेट बनवायला त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार राजेश पवार यांनी धर्माबाद नगरपालिका अंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी तब्बल 72 कोटी रुपयाचा निधी मंजूर केल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार धर्माबाद वासिंयातर्फे करण्यात आला. यावेळी धर्माबाद शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे कट्टर समर्थक वर्णी नागभूषण,धर्माबाद शिक्षण संस्थेचे सचिव तथा मानांकित डॉ.कमल किशोर काकांनी, भाजपाचे तालुका अध्यक्ष विजय डांगे, शहराध्यक्ष रमेश अण्णा गौड, बाजार समितीचे संचालक दत्ताहरी पाटील आवरे यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष विजयकुमार राठौर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मन्मत आप्पा, श्रीनिवास पाटील भुतावळे, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते शंकर आन्ना तुनकेवार ,तुकाराम पाटील महा गवळी यांच्यासह अनेक मान्यवर व प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जीर्ण झालेल्या पोलीस इमारतीचा प्रश्न मार्गी लागणारच अशी आशा निर्माण झाल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण यावेळी पसरले होते.