गोलू बाराहते
बीबीसी माझा, चंद्रपूर
चंद्रपूर शहरातील नीट/ जेईई अभ्यासक्रम शिकविणाऱ्या नामांकित इंस्पायर कोचिंग क्लासेसमध्ये नीट अभ्यासक्रमाला असणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास घेवून आत्महत्या केली. ही आत्महत्या याच क्लासेसच्या वसतिगृहात करण्यात आली. प्रांजली राजूरकर असे या मुलीचे नाव असून, ती यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथील रहिवासी आहे. बारावीनंतर ती इंस्पायर कोचिंग क्लासेसमध्ये नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी आली होती. संस्थेच्या मालकीच्या वसतिगृहात ती राहत होती. आज सायंकाळच्या सुमारास ती खोलीत एकटीच असताना गळफास घेतला. या आत्महत्येमागील कारण अद्याप पुढे आलेले नाही. पोलिसांनी शव उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेले. दरम्यान, अभ्यासाच्या तणावातून ही आत्महत्या झाली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जातेय.