संजय (गोलू) बाराहाते
बीबीसी माझा, चंद्रपूर
जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त वन अकॅडमी (रेंजर कॉलेज) येथे मोठ्या उत्साहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. पुष्पहास बल्लाळ, माजी सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, नागपूर यांची उपस्थिती होती. त्यांच्यासोबत मोटीवेशनल स्पीकर चेतन मारवाह देखील उपस्थित होते.
फार्मासिस्ट फोरमचे अध्यक्ष गणेश झाडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. चंद्रपूर जिल्ह्यातील सहा फार्मसी कॉलेजमधील 700 हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. गेल्या सहा दिवसांत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये बुद्धिबळ, बॉक्स क्रिकेट, बॅडमिंटन, एकल नृत्य, सामूहिक नृत्य आणि गायन स्पर्धांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सचिव पंकज देशमुख, सह सचिव तुषार सांबरे, सागर मंडल आणि सचिन खोब्रागडे यांनी विशेष परिश्रम घेतले. उपाध्यक्ष श्रीकांत रेशीमवाले यांनी आभार प्रदर्शन केले. सी.डी.सी.डी.ए.चे अध्यक्ष बंटी घाटे, उत्तरवार कुंदन, धमादीप रामटेके यांच्यासह फोरमचे सर्व पदाधिकारी आणि अनेक फार्मासिस्ट उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल बोरकर यांनी केले.
या कार्यक्रमाद्वारे फार्मासिस्टांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकण्यात आला आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.