वरदान बनावा म्हणुन मीच आणलेला ऊद्योग आता महाशाप ठरु नये – राजे अम्ब्रिशराव आत्राम

एटापल्ली येथे भव्य पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा संपन्न; राजेंचा जोरदार स्वागत!

एटापल्ली
ऊद्योगरहीत जिल्हा म्हणुन असलेली ओळख पुसत पालकमंत्री या नात्याने मोठा ऊद्योग मी आणला होता.जनतेला अडचण होताच रस्ते निर्माण होईस्तोवर काम थांबवायचे निर्देश सुध्दा दिले.त्याकाळात रस्त्यावर बसुन विरोध करणार्‍यांनी आता सपशेल लोटांगन घातले आहे. सुरजागड लोहखनिज प्रकल्पाच्या कामात स्थानिकांमधून ८० टक्के बेरोजगारांना सन्मानपूर्वक रोजगार मिळण्याचा अटीवर मी मंत्री असतांना करार केला होता.मात्र सुरजागड कंपनी कडून परप्रांतीय नोकरदारांना दुप्पट पगार व सर्व सोयी सुविधा पुरविल्या जात असताना स्थानिक कामगारांना मात्र अर्धा पगार व कोणत्याही सोयी उपलब्ध केल्या जात गंबीर मुद्दा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी कार्यकर्ता मेळाव्यातून उपस्थित केला.त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मला साथ द्या,माझेकडून स्थानिकांवरील अन्याय दूर केला जाईल,असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडून अहेरी विधानसभा क्षेत्रातील मुलचेरा,भामरागड,अहेरी एटापल्ली व सिरोंचा या पाचही तालुक्यात झंझावात दौरे सुरू करून कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले जात आहे.एटापल्ली येथील आदिवासी सांस्कृतिक भवन गोटूल येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.यावेळी बोलताना गेल्या पाच वर्षांपासून कंपनी रोजगारासाठी स्थानकावर सतत अन्याय केला जात आहे.मात्र स्थानिक आमदार तथा मंत्री धर्मराव बाबा आत्राम हे या समस्येकडे कोणतेही लक्ष देताना दिसून येत नाहीत,त्यामुळे आगामी निवडणुकीत अशा निष्क्रिय आमदारांना घरचा रस्ता दाखविण्याची गरज असल्याचेही मत राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी व्यक्त केला!

पुढे बोलताना सुरजागड प्रकल्पात जास्तीत जास्त परप्रांतीय युवकांना रोजगार देऊन स्थानिकांना डावलले जात आहे.यातून परप्रांतीयान खैरात वाटली जात असून स्थानिकांची बोळवण केले जात आहे.तसेच स्थानिक नोकरदारांना पगार तटपुंज्या पगारच नाही तर चौकीदार व सुरक्षारक्षकांसारख्या कमकुवत दर्जाच्या कामावर ठेऊन अपमानित केले जात आहे.मंत्री महोदय हे का गप्प बसले आहेत? मी निवडून आल्यावर हे सर्व चित्र बदलवून परप्रांतीयांना प्रकल्पाच्या बाहेर करून स्थानिक बेरोजगार युवकांना प्राधान्य क्रमाने सुरजागड प्रकल्पाच्या नोकरीत सामावून घेण्याची सक्ती केले जाईल,अन्यथा सुरजागड लोहखनिज करणाऱ्या कंपनीला आपली आशा गुंडाळावी लागेल.

यावेळी मंचावर प्रशांत आत्राम,प्रकाश गुडेल्लीवार,मोहन नामेवार,अशोक पुल्लूरवार,दीपक सोनटक्के,राहुल कुळमेथे,वनिता कोरामी,सुनीता चांदेकर,विजयालक्ष्मी जबोजवर, बाबला मुजुमदार,सम्मा जेट्टी,सागर मंडल,दीपक पांडे,अनिकेत मामिडवार,मनीष ढाली,आशिष बक्षी,सुधीर तलांडे उपस्थित होते!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *