मागील काही दिवसापासून जिल्ह्यात मुल तालुक्यात वन्यप्राणी हल्याच्या घटनांत लक्षणीय वाढ झाली आहे. अशीच एक दुर्दैवी घटना १ सप्टेंबरला दुपारी अडीच तीन च्या दरम्यान घटली. जानाळा बीड क्रमांक 353 मध्ये वाघाच्या हल्ल्यात गुलाब हरी वेलमे वय वर्ष 52 यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गुलाब वेळमे नेहमीप्रमाणे प्रमाणे गुरे चारत होते त्याच दरम्यान अचानक वाघाने चराई करत असलेल्या गाईवर हल्ला केला. हे पाहता क्षणी गाईला वाचण्यासाठी गुलाब वेळमे सरसवले असता वाघाने त्यांच्यावर हल्ला केला व त्यांना जागीच ठार केले. सोबत असलेले गुराखी घाबरलेल्या अवस्थेत आरडाओरडं केल्यामुळे वाघ तिथून पळून गेला. या वाढत्या वन्य प्राणी हल्ल्यामध्ये निष्पाप लोकांचा बळी जात आहे.
त्यांच्या सुरक्षितेची कुठलीच उपाययोजना होताना दिसत नाही. फक्त टायगर सफारी आणि पर्यटनावर भर दिला जात आहे. अशी खंत जनसामान्यातून व्यक्त होत आहे. सदर घटनेची माहिती मिळताच वनपरीक्षेत्र अधिकारी आर एस कारेकर, पोलीस निरीक्षक सुमित परतेकी, वनक्षेत्र सहाय्यक ओ एस थेरे, वनरक्षक एम एस पाडवी यांनी घटनास्थळी पंचनामा करुन मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवले.
सदर घटनेची माहिती मिळताच काँग्रेस नेत्या डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी मुल रुग्णालय येथे जाऊन वेळमे कुटुंबाच्या दुःखात सामिल होऊन नातेवाईकांचे सांत्वन केले. या घटनेची संवेदना जपत वनविभागाने डॉ. अभिलाषाताई गावतुरे यांच्या उपस्थितीत वेळमे कुटुंबाला रू २० हजार तत्काळ आर्थिक सहाय्य दिले.
फिस्कुटी येथील मोहूर्ले परिवाराला दिली सांत्वनपर भेट
या दुर्दैवी घटनेच्या एक दिवस (३१ ऑगस्ट) आधी मुल तालुक्यातील फिस्कुटी गावात शेजारील घराची भिंत कोसळून पती रघुनाथ अशोक मोहूर्ले (६०) आणि पत्नी लता अशोक मोहूर्ले (५५) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. डॉ. अभिलाषाताई गावतुरे या पती-पत्नी च्या अंत विधीला उपस्थित राहून पोरक्या झालेल्या ४ मुलींसोबत मोठ्या बहीणी सारखी उभी राहिन अशी ग्वाही दिली.
यावेळी डॉ. अभिलाषाताई गावतुरे सोबत सीमाताई लोनबले, छायाताई सोनुले, नितेश मॅकलवार यांची उपस्थिती होती.