उभा विटेवरी काशे पितांबर रखुमाई सोबत चंद्रभागा तिरेवर…..
दुमदुमते पंढरी तुझ्या नाम घोषात टाळ मृदुंगाचे गजर किती रे जोशात…
उभा विटेवरी काशे पितांबर रखुमाई सोबत चंद्रभागा तिरेवर…..
तुझ्या भेटीसाठी मनी सदा आस येईल भेटीसाठी यंदा तुझा दास…..
वारी पंढरीची वैष्णवांचा मेळा मुखी हरीनाम भाळी चंदनाचा टिळा….
आषाढी एकादशीला जमती सारे वारकरी हरीनामाच्या गजरात मग्न होती नरनारी….
चंद्रभागे तिरी भाविक करी स्नान पूर्ण होत असे भक्तांचे समाधान….
तुझ्या चरण स्पर्शाने हरपले देहभान नाव घेता मुखी लहान थोर होती महान….
पांडुरंग कैवारी विठ्ठलाची जोडी जशी साजूक तुपाची विठ्ठल रूखमाई ची जोडी.
राहो आमच्यावरील सदा तुझी सावली तूच साऱ्या जगताची विठुराया माऊली…..
सीमाराणी बागुल नाशिक
