मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या संतधार पावसाने जिल्ह्यात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. मुल बल्लारशाह, पोंभूर्णा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुल बल्लारशाह, पोंभूर्णा तालुक्यातील गावांमध्ये काही ठिकाणी पाणी शिरले आहे आणि रस्ते आणि पूल पाण्याखाली गेल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे. यावरती तातडीने उपाययोजना म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने तत्काळ स्थानिक प्रशासन स्तरावरून आर्थिक आणि जीवनापयोग वस्तुरूपी मदत पोहचवण्याची मागणी डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी केली आहे.
शेतीचे शिवार हे पूर्णतः पाण्याखाली बुडून गेल्याने उभे पिक जमिनोद्स्त झाले आहेत आणि काही ठिकाणी राहत्या घरांची पडझड झाल्याचे समस्ते आहे. आधीच शेतकऱ्यांचा पिक विमा चा प्रश्न सुटत नाहीये त्यावरती पावसाच्या मारामुळे शेतकरी हवालदिल झालाय. शासनाने शेतीच्या शिवाराची पाहणी करून ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी केली.