कार्यकर्ता नियोजित वाढदिवसाचा कार्यक्रम रद्द, निधी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी – भूमिपुत्र ब्रिगेड

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल, बल्लारपूर, पोंभुर्णा व चंद्रपूर येथे पुर परिस्थिती निर्माण झालेली आहे. क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे लोकांचे अन्नधान्य, घरगुती सामान व इतर साहित्यांचे खूप नुकसान झाले आहे.

सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन भूमिपुत्र कार्यकार्त्यांद्वारे २३ जुलै रोजी डॉक्टर राकेश गावतुरे यांच्या वाढदिवसा निमित्त मूल, बल्लारपूर, पोंभुर्णा व चंद्रपूर येथील भूमिपुत्र ब्रिगेड संघटन द्वारे नियोजित कार्यक्रम रद्द करून कार्यक्रमासाठी गोळा केलेला निधी पूरग्रस्तांच्या मदत कार्यास वापरण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती भूमिपुत्र ब्रिगेडचे जिल्हाधक्ष्य श्री. विजय मुसळे यांनी दिली.

नियोजित वाढदिवसाचा कार्यक्रम मुल येथील कन्नमवार सभागृहात सकाळी १०:०० ते ०१:०० वाजता, पोंभूर्णा दुपारी ०२:०० ते ०४:०० वाजता, चंद्रपूर येथे सायंकाळी ०५:०० ते ०७:०० वाजता आणि बल्लारपूर मधील एकदंत सभागृहात सायंकाळी ०८:०० ते १०:०० वाजता घेण्यात येणारे कार्यक्रम रद्द केले या शिवाय विविध गावातील भूमिपुत्र ब्रिगेडच्या शाखांद्वारे घेणात येणारे विविधं उपक्रम सुद्धा रद्द करणात आले.

“भूमिपुत्र ब्रिगेड संघटनेने घेतलेला निर्णय योग्य आहे” असे डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *