ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचणारी एकमेव वाहिनी म्हणजे जिल्हा परिषदेची शाळा. पूर्वी असंख्य उपक्रम या शाळें साठी राबविले जात होते, मात्र कॉन्व्हेंट कल्चर आल्यापासून जिल्हा परिषद शाळे महत्व काहीसे कमी झाल्याचे दिसते. तरी देखील जिल्हा परिषद शाळेमध्ये जे विद्यार्थी अशा विद्यार्थ्यांसाठी एक चांगला उपक्रम ग्रामपंचायत बेंबाळ अंतर्गत असलेली जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे घेण्यात आला इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वितरण करण्यात आले.
यावेळेस ग्रामपंचायत बेंबाळ चे सरपंच चांगदेव भाऊ केमेकार, उपसरपंच देवा भाऊ ध्यानबोईवार, ग्रामपंचायत सदस्य विनोद वाढई,ग्रामपंचायत सदस्य अरुणाताई गेडाम, ग्रामपंचायत सदस्य आशाताई मडावी, ग्रामपंचायत सदस्य प्रतिमा ताई भडके, ग्रामपंचायत सदस्य आशाताई शेंडे, ग्रामपंचायत सदस्य कविता ताई नंदिग्रामवार, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उमेश कत्रजवार ,मनोज चटारे, पराग कुसराम व मारुती भाऊ ध्यानबोईवार इत्यादी उपस्थित होते.