राज्यात एकूण १२ हजार स्थाई वन मजुरांची भरती करण्यात येणार आहे
प्रमोद गहलोत
बीबीसी माझा, बल्लारपूर
वन मजूर हे वन विकास महामंडळातील वन संरक्षण व वन संवर्धण करण्याकरीता अतिशय महत्वाचा घटक आहेत. वन मजूर हे स्थानिक असल्यामुळे तसेच त्यांना त्यांचे क्षेत्राची इत्तम्भूत माहिती असल्यामुळे त्यांचेशिवाय संबंधित वनरक्षक किंवा वनपाल हे जंगलामध्ये गस्त करू शकत नाहीत. तसेच वन मजूर यांचे स्थानिक पातळीवर सुद्धा चांगले संबंध तयार झालेले असतात. त्यामुळे वनसंरक्षणाचे दृष्टीने, गुन्हेगारांची गुप्त माहिती असो किवा वन गुन्हा तपास काम असो याकरिता वन मजूर हे अतिशय महत्वाची भूमिका पार पाडतात.
परंतु काळानुसार वन विभागात कार्यरत असलेले स्थाई (अधिसंख्य) वनमजूर नियत वयोमानाने निवृत्त झाल्यामुळे वन मजुरांची संख्या कमी झाली असल्याने त्याचा अनिष्ट परिणाम वने व वन्य जीवांचे संरक्षण व संवर्धन करण्यावर होत आहे. सध्यस्थितीत तात्पुरत्या स्वरुपात कामावर घेतलेल्या वन मजुरांच्या मदतीने कामे पाहण्यात येत आहेत. त्यामुळे राज्यात एकूण १२ हजार स्थाई वन मजुरांची भरती करण्यात येणार आहे व सदरचे वन मजूर हे स्थानिक रहिवासी असतील, अशा प्रकारचा प्रस्ताव शासनास कार्यालयामार्फत सादर केलेला आहे. वन विकास महामंडळात नव्याने स्थाई वनमजुरांची भरती करणेपूर्वी अगोदरच वन विकास महामंडळात रोजंदारीवर काम करणारे बारमाही तसेच हंगामी वन मजुरांना प्रथम प्राधान्य देऊन सेवेत कायम करण्याच्या निवेदनात म्हटले आहे.
किमान वेतन दराप्रमाणे सलग स्वरुपात बारमाही रोजंदारीवर काम करणारे व हंगामी स्वरुपात काम करणारे वन मजूर यांचेकरिता किमान २० टक्के पदे आरक्षित ठेवणे सोबत इतर मागण्याची मागणी केले आहे.
यावेळी प्रमोद काटकर, अरुण धकाते, आशिष मुंजनकर, संजय सोनटक्के, अमोल नुसतवार, चरण गुंडावार सह आदी वन मजूर उपस्थित होते.