तारेवरची कसरत करुन मुले चालली शाळेत. जनतेची मागणी पण ग्रामपंचायत नागेपल्लीचे दुर्लक्ष!
प्रा.राणी कुमरे
जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
पुसुकपल्ली- गट ग्रामपंचायत नागेपल्ली अंतर्गत येत असलेल्या पुसुकपल्ली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. शाळे समोरील रस्त्या लगत मोठ्या प्रमानावर केरकचरा जमा झाला आहे. पावसामुळे नाल्या तुंबून वाहत असून नाल्या मधील घान व केरकचरा रस्त्यावर आला आहे. त्यामुळे सर्वत्र परिसर चिखलामय झाला आहे. या चिखलातून शाळेत जाताना मात्र विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.
नाली व गटारी पावसाच्या पाण्यानी भरल्याने त्यातील दुर्गंधीयुक्त घाण पाणी रस्त्यावर पावसाच्या पाण्यात मिश्रित होत आहे. त्यामुळे सर्वत्र चिखलमय वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे गावाचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. कोरोना काळात शाळा बंद होत्या. आता कुठे त्या पूर्ववत व नियमित सुरू झाल्या आहे.महिन्याभरापूर्वी बऱ्याच कालावधीनंतर शाळेची घंटा वाजली. शैक्षणिक धडे घेयासाठी विद्यार्थी आतुर आहेत, पण चिखलाचा रस्ता आडवा येतोय. या रस्त्यावरून पावसाळ्यात शाळेला जाताना मोठी कसरत करावी लागते.
शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना चिखल तुडवीत जावे लागते. अनेक विद्यार्थी तसेच नागरिक चिखलात घसरून पडतात.पावसाच्या पाण्यामुळे झालेल्या चिखलमय रस्त्यावरून नागरिकांना त्याचप्रमाणे खास करून विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. या खराब रस्त्यामुळे विद्यार्थ्यां व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाला वारंवार विनंती करून ही प्रशासन या बाबी कडे लक्ष देत नसल्याने स्थानिक नागरिकांन मध्ये संताप व्यक्त केला जात आहे.