श्रीलंका दौऱ्याचे सुधारित वेळापत्रक जाहीर; टी-२० मालिका २७ जुलैपासून

बीसीसीआयने शनिवारी भारताच्या श्रीलंका दौऱ्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. टी-२० आणि एकदिवसीय मालिकेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून, आता टी-२० मालिका २७ जुलैपासून सुरू होणार आहे. झिम्बाब्वे दौऱ्यानंतर भारतीय संघ श्रीलंकेचा दौरा करणार असून, येथे ३ सामन्यांची टी-२० मालिका आणि ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.

नव्या वेळापत्रकानुसार, टी-२० मालिकेचा पहिला सामना २७ जुलैला होणार आहे. दुसरा सामना २९ जुलैला आणि तिसरा सामना ३० जुलैला खेळवला जाईल. सर्व सामने पल्लेकेले येथील स्टेडियमवर होणार आहेत.

या दौऱ्यात हार्दिक पंड्याकडे टी-२० संघाचे आणि केएल राहुलकडे एकदिवसीय संघाचे नेतृत्व सोपवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *