- पात्रता : बारावी पास
- वयोमर्यादा: १८ ते ३५ वर्ष दरम्यान असावे व विधवा असलेल्या महिलांना चाळीस वर्षे वय
आनंदाची बातमी नोकरीच्या शोधत असणाऱ्या बेरोजगार महिला व तरुणींना एक चांगली रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे. कारण की राज्यात अंगणवाडी सेवकांची भरती सुरू झालेली आहे त्यामुळे महिलांनी आपला अर्ज लवकरात लवकर करावा.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यांमधील जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण आदिवासी नागरी प्रकल्पामधील कार्यरत असणाऱ्या एकूण 14 हजार 690 अंगणवाडी मदतनिसांच्या रिक्त पदांची भरती सुरू झालेली आहे.
महिला आणि बालविकास विभागामार्फत दिलेल्या आदेशानुसार या पदाकरता भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रिया करिता कालबद्ध कार्यक्रमासह राज्यातील सर्व जिल्हा परिषद स्तरावर सूचना दिल्या गेल्या आहेत. अंगणवाडीच्या मदतीने या पदाकरिता संबंधित बालविकास प्रकल्प ग्रामीण आदिवासी नागरी कडून स्थानिक स्तरावर जाहिरात दिल्या गेले आहेत. इच्छुक महिला उमेदवारांनी संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे कार्यालयांत अर्ज करावा.