प्रा. राणी कुमरे
बीबीसी माझा, गडचिरोली
स्थानिक राजे धर्मराव कला वाणिज्य महाविद्यालयात अल्लापल्ली येथे जास्वनील रामदास कुबडे बी. ए. अंतिम वर्ष (2023-24) भूगोल विषयात गोंडवाना विद्यापीठात प्रथम येऊन विद्यापिठा द्वारे घेण्यात येणाऱ्या पदवीदान समारंभात दिनांक २ऑक्टोबर २०२४ ला राज्यपालाच्या हस्ते कुमार जास्वनील रामदास कुबडे या विध्यार्थ्याला सुवर्ण पदकाने सन्मानित केले. त्याबद्दल महाविद्यालयाने देखील सत्कार समारंभाचा कार्यक्रम दिनांक 4 ऑक्टोबर 2024 ला आयोजित करून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम यु टिपले यांच्या हस्ते शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले.
प्राचार्य अध्यक्ष स्थानावरून बोलताना मेरीट येणाऱ्या विद्यार्थ्याला पुढील भविष्यात अशीच उत्तरोत्तर प्रगती साधावी. सोबतच उपस्थित सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन विद्यापीठातून प्रथम यावे असे आवाहन केले. तसेच मंचकावर उपस्थित अतिथी प्रा. डॉ.राजेश कुमार सुर यांनी प्रास्ताविक पर मार्गदर्शन केले. तर डॉ. नीरज खोब्रागडे प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर विराजमान होते. संचालन व आभार प्राध्यापक दया मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील समस्त प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी तसेच बहुसंख्य विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.