संजय बाराहाते
बीबीसी माझा, चंद्रपूर
आज दिनांक 29 ऑक्टोबर 2024 नामांकन भरण्याच्या शेवटच्या दिवशी चंद्रपूर विधानसभा मतदार संघातील आघाडीचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार प्रवीण पाडवेकर नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी भव्य मिरवणूक गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत काढण्यात आली.
मिरवणुकीमध्ये चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे, चंद्रपूर काँग्रेसचे नेता विनायक बांगडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे दीपक जयस्वाल,आप चे नितीन मुसळे, सेना व रिपब्लिकन पार्टीचे बहुसंख्य कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी होते.
उमेदवार प्रवीण पडवेकर यांनी आपण अतिशय सामान्य कुटुंबातील एक काँग्रेसचा कॉलेज जीवनापासून एन एस यु आय च्या माध्यमातून काँग्रेस कार्यकर्ता म्हणून नंतर नगरसेवक म्हणून मी जनतेची सेवा करीत आलो आज या सामान्य कार्यकर्त्याला आघाडीच्या सर्व पक्षांनी काँग्रेसची उमेदवारी देऊन मोठा सन्मान केला मी त्यांचे आभारी आहे.