शुभम कावळे, चंद्रपूर
गणेशमूर्ती, सजावट साहित्य विक्रीची दुकाने शहरातील मुख्य रस्त्यावर थाटली जात होती. गणेशभक्तांची मोठी गर्दी होत असल्याने मूर्ती खरेदी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. गणेशभक्तांना होणारा त्रास कमी करण्यासोबतच बचतगटाच्या महिला, मूर्तीकार यांना व्यासपीठ देण्याच्या उद्देशातून महापालिकेच्यावतीने यावर्षी चांदा क्लब मैदानावर मूर्ती विक्री, सजावट साहित्य प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्याहस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात सुमारे २०० स्टॉल लावण्यात आले आहेत. त्यामुळे भक्तांना आता भक्तिमय वातावरणात बाप्पाची मूर्ती, सजावटीचे साहित्य खरेदी करता येणार आहे. या प्रदर्शनाला चंद्रपूरकर गणेशभक्तांनी भेट देऊन लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त पालिवाल यांनी यावेळी केले.