पोळ्याचा दिवशी बळीराजावर पूर कोपला : मिरचीचे पिक पाण्याखाली : पुरात शिरून झाडे काढण्यासाठी बळीराजाची धडपड

शुभम कावळे
जिल्हा प्रतिनिधी

शेतकऱ्यांच्या अतिशय जिव्हाळाच्या सण म्हणजे पोळा. या सणाच्या आनंदावर नदीला आलेल्या पुराने विरजन टाकले. पूर शेतात शिरला, पिके पाण्याखाली आली आहेत. मिरचीचे पीक पुरातून वाचवण्यासाठी धडपडत असणाऱ्या बळीराजाच्या कुटुंबाचा एक व्हिडिओ पुढे आला.बालाजी चौधरी असे शेतकऱ्याचे नाव असून ते गोंडपिपरी तालुक्यातील अडेगाव येथील रहिवासी आहे.चार एकर मध्ये त्यांनी मिरची पिकाची लागवड केली होती.वर्धा नदीला पूर आला. या पुरात शेत पाण्याखाली आले आहे.मिरचीचे पीक वाचवण्यासाठी त्यांचा कुटुंबीयांनी पुराच्या पाण्यातून मिरचीचे रोपे उपडून बाहेर काढीत आहेत. वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आली आहे.पूर लवकर ओसरला नाही तर पिके कुजून जाण्याच्या धोका वाढला आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *