काँग्रेस हटाव संविधान बचाव, बीजेपीचे अनोखे आंदोलन

संजय (गोलू) बाराहाते
बीबीसी माझा, चंद्रपूर

चंद्रपूर : राहुल गांधी यांच्या विदेशातील वक्तव्यामुळे काँग्रेसचा खरा चेहरा समोर आलेला आहे. राहुल गांधी जेव्हा जेव्हा विदेशात जातात तेव्हा तेव्हा ते भारत मातेची बदनामी करतात असा घाणाघाती आरोप सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. स्थानिक चंद्रपुरातील गांधी चौक येथे काँग्रेस हटाव संविधान बचाव या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. अमेरिकेमध्ये राहुल गांधी यांनी केलेल्या संविधानाच्या वक्तव्याबाबत हे आंदोलन करण्यात आलेले होते. या आंदोलनाला महाराष्ट्राचे वन व संस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह भाजपाचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *