प्रोऍक्टिव्ह अबॅकस द्वारा आयोजित नॅशनल कॉम्पिटिशन 24-25 कोल्हापूर मध्ये पार पडली
संजय बाराहाते, जिल्हा प्रतिनिधी, बीबीसी माझा
चैतन्य ब्रेन-पॉवर प्रोॲक्टिव अबॅकस,चंद्रपूर मध्ये मा. धिरज बक्षी सर, आणि आद. निर्जरा बक्षी मॅडम यांच्या मार्गदर्शन खाली शिक्षण घेत आहे. मागील दोन रिजनल कॉम्पिटिशन मध्ये चैतन्य 1 मार्काने मागे राहिला परंतु नॅशनल करिता त्याची निवड झाली होती, वडिलांचे पाहिजे तेवढे मत नव्हते परंतु आईने पुढाकार घेऊन चैतन्य चा सहभाग घेतले राज्यातून 2500 चे विद्यार्थ्यां मधून चैतन्य प्रथम आला.
परीक्षेचे स्वरूप 6 मिनिटात 100 गणिते सोडूवणे होते त्यात चैतन्य ने 5 मिनिट 28 सेकंद मध्ये 100 गणिते सोडवून 100 पैकी 100 गुण प्राप्त करून, स्वतःचे, परिवाराचे, आपल्या क्लास आणि चंद्रपूरचे नाव लौकीक केले, विजयी दरम्यान ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि सायकल बक्षीस देण्यात आले.
आज चैतन्य देशात पहिला आलेला पासून सगळीकडे त्याचे हर्ष उल्हसाने अभिनंदन आणि सत्कार करण्यात येत आहे. चैतन्य धकाते हा सेंड मायकल शाळेचा इयत्ता चौथीचा विद्यार्थी आहे. शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांकडून त्याचे कौतुक केले जात आहे. त्याच्या शिक्षकांनी त्याला पुढील शिक्षणा करिता खूप खूप शुभेच्छा दिल्या.