आता लढायचेच ! माघार नाही: राजे अम्ब्रीशराव महाराजांनी स्पष्ट केली भुमिका

कोणत्याही स्थितीत आम्ही राजें सोबतच! सर्व भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे एकमुखाने समर्थन!

राणी कुमरे
गडचिरोली जिल्हा प्रतीनीधी

महायुती मध्ये तिसरा भिडू आल्यानंतर राज्यात बर्‍याच विधानसभा क्षेत्रात घालमेल सुरु झाली. असुरक्षितता जाणवल्याने कैक इच्छूक ऊमेदवारांनी पक्षांतर सुध्दा केले.अहेरी विधानसभा क्षेत्रातही महायुतीत तिढा निर्माण झाला.विद्यमान आमदार तथा कॅबीनेट मंत्री रा.काँ.चे असल्याने तिकीट युतीच्या कोणत्या घटपक्षाकडे जाणार याबद्दल संभ्रम आहे अशा परिस्थितीत राजे साहेब काय भुमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.अहेरी येथे पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकीत जमलेल्या कार्यकर्त्यांचे मत घेऊन आगामी विधानसभा निवडणुक पक्षाचे तिकीट मिळो अथवा न मिळो लढणारच असल्याचे जाहीर करताच सभागृहात जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी जोरदार आवाजाने पाठिंबा व्यक्त केला.

अराजकतेला ऊखडून फेकायची वेळ आली आहे!
मागिल काही वर्षांपासुन या भागात शासन नव्हे तर कंपनीच राज्य करत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कंपनीच्या वाहनांमुळे कित्येक बळी पडले आणि कित्येक गंभीर जखमी झाले.अपघात घडल्यावर मृत अथवा जखमींची सोय करण्याएवजी कंपनीच्या सोयीची काळजी घेतल्या जाते. स्थानिकांना नौकरी देण्याऐवजी राजकीय नेतेच तिथे चाकरी करत असल्याची टिका त्यांनी केली. कंपनीमुळे रस्ते,शेती,नदी, नाले यांचे प्रचंड नुकसान होत असुन नागरीकांचे स्वास्थ्य धोक्यात आले आणि सगळीकडे हाहाकार माजला आहे. परिसरातील अराजकतेला बदलवुन विकासासाठी तसेच भविष्यासाठी विचार करण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगीतले.

वयाला शोभेल असे कृत्य करावे!
आवश्यकते पेक्षा कित्येकपटीने जास्त पैसा जमा झाला की व्यक्तीचा मानसिक तोल ढासळतो आणि काहीही सुचायला लागते. वानप्रस्थाश्रमच्या वयात लोकं सिनेमा काढायला लागलेत हे शोभते काय? असा चिमटा काढताच ऊपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ झाल्याचे पाहायला मिळाले.कित्येक वर्षांपासून माझे शेवटची निवडणूक आहे अस सांगणार्‍याची खरीच शेवटची निवडणूक केव्हा ? असा खोचक सवाल केला.वारंवार मुलीला संधी देणार असे सांगुन ऐनवेळी पुन्हा बाशिंग बांधल्याने सत्तेची हाव लक्षात येते.

इकडे लूटारु तिकडे चोर!
एका बाजुला कंपनी स्थानिक नेत्यांना दावणीला बांधून परिसरातील लूट सुरु आहे तर दुसरीकडे गोरगरीबांची,आदिवासींच्या जमिनी हडपणारे चोर आहेत अशी परिस्थिती विधानसभाक्षेत्रात निर्माण झाली आहे.आता जनतेनी प्रामाणिकतेला प्राधान्य दिलेच पाहीजे असे प्रतिपादन केले.

कित्येक मुद्द्यावर खुमासदार शैलीत भाषण करतांना वेळोवेळी सभागृहात हशा पिकत होता व कार्यकर्ते,पदाधिकारी खिळून बसले होते.

प्रत्येक बैठकींना कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने स्वयंस्फुर्तपणे ऊपस्थिती व प्रतिसाद बघता आगामी निवडणुकीत जनतेचा कल कुणीकडे आहे याचा अंदाज लागतो.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांनी केले.प्रास्तावीक तालुकाध्यक्ष संतोष मद्दीवार यांनी केले तर आभार शहराध्यक्ष मुकेश नामेवार यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अहेरी व आलापल्लीच्या सर्व पदाधिकार्‍यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *