गावातील सांडपाणी वाहून नेणारी नाली पूर्णपणे भुजलेली, ग्रामपंचायतचे दुर्लक्ष, गावातील लोकांच्या आरोग्याला व जिवाला धोका
पोम्भूर्णा तालुक्यातील चकठाणा गावातील सांडपाणी वाहून नेणारी नाली कचरा व मातीने पूर्णपणे भुजलेली आहे त्यामुळे सांडपाणी व पावसाचं पाणी अनेक ठिकाणी साचुन राहिला आहे व पाणी गावातील लोकांच्या घरात शिरत आहे. यामुळे कुत्रिम पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.
सांडपाणी साचून राहिल्यामुळे जंतू व मच्छरांचा प्रादुर्भावणे गावातील लोकांचे विशेषतः लहान मुलांचे आरोग्याला व जिवाला धोका निर्माण झाला आहे. नाली कचरा व मातीने पूर्णपणे भुजलेल्याने सांडपाणी व पावसाचे पाणी आता पावसाळ्यात लोकांच्या घरात शिरत आहे. यामुळे साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मागील एक महिन्यापासून गावातील लोकांनी ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रासेवक यांना नाली सफाई व खोलीकरण करण्याचे विनंती करत आहेत, पण ग्रामपंचायत हे ना ते कारण देत नाली सफाई व खोलीकरणचे काम टाळत आहे. ग्रामपंचायत गावातील लोकांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करून लोकांच्या आरोग्याशी आणि जिवाशी खेळत आहे.
गावातील नागरिकांनी आशा व्यक्त केली आहे कि, आता तरी ग्रामपंचायतने याकडे लक्ष देऊन गावातील लोकांच्या आरोग्याशी व जिवाशी खेळणे थांबवेल.