अहेरी विधानसभेचे रस्ते खड्डे मुक्त करण्याकरिता गणपतीबाप्पा कडे राजेसाहेब यांचे साकडे
प्रा. राणी कुमरे
अहेरी (गडचिरोली) : येथील राणी रुख्मिणीदेवी महल पटांगणात माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री गडचिरोली जिल्हा राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी शनिवारी सायंकाळी आपल्या परिवारा सोबत श्री गणरायाची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना केली.गडचिरोली जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या आयुष्यात सुख-समृद्धी,समाधानाचे चांगले दिवस येऊ दे,गडचिरोली जिल्ह्याची प्रगती झपाट्याने होऊ दे यासाठी आमच्या प्रयत्नांना बळ देण्याचे व अहेरी विधानसभेचे रस्ते खड्डे मुक्त करण्याचे साकडे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम गणरायाला घातले.
दरवर्षी प्रमाणे यंदाही माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या राणी रुक्मिणीदेवी महल पटांगणात गणरायांचे आगमन झाले. माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम त्यांच्या आई राजमाता रुख्मिणी देवी,लहान बंधू कुमार अवधेशरावबाबा आत्राम यांनी श्री गणेशाची विधिवत पूजा व आरती केली.यावेळी माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी गडचिरोली जिल्ह्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.आजचा दिवस उत्साहाचा असून, विघ्नहर्ता गणरायाचे सर्वत्र आगमन झाले आहे.दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील गणेशोत्सव उत्साह आणि आनंदात साजरा होत आहे.
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर मा.राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या हस्ते विधीवत पूजन करून गणेशाचे प्रतिष्ठापना करण्यात आले, यावेळी राजमाता राणी रुक्मिणीदेवी,कुमार अवधेशराव बाबा, प्रवीणराव बाबा ह्यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती, दरवर्षीप्रमाणेच विलोभनिय मुर्ती व सजावटीने भाविकांचे मन आनंदीत होऊन जात आहे, गणेश दर्शनासाठी अहेरी परिसरातील नागरीकांची मोठी गर्दी सद्या होत आहे.