बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील सुधीर मुनगंटीवार विरुद्ध डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्यातील लढत जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. लोकसभेत एका बाई न पाडलं आता सुद्धा एक बाईच पाडणार, काही खोके देऊन पक्षाचे अधिकृत उमदेवार झालेत आणि डाँ अभिलाषा गावतुरे जनतेचे अधीकृत उमदेवार झालेत अशा मतदारसंघातील सामान्य जनतेमध्ये एक ना अनेक विषयांची चर्चा सुरू आहे.
बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात एकूण २० उमेदवारांनी ३७ उमेदवारी अर्ज दाखल केले. या सर्व उमेदवारी अर्जांमध्ये तीन अपक्ष उमेदवारी अर्जांची विशेष चर्चा रंगली आहे. डॉ. अभिलाषा गावतुरे (वय ४५ वर्ष) राहणार मूल आणि गावतुरे अनिता मधुकर (वय ५१ वर्ष) मु. पो. फिस्कुटी तालुका मूल जिल्हा चंद्रपूर आणि गावतुरे छाया बंडू (वय ५१ वर्ष) मु. पोस्ट मूल तालुका मूल या तीन नावांची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा सुधीर मुनगंटीवार यांनी चांगलाच धसका घेतला आहे आणि म्हणून मुनगंटीवार साम-दाम-दंड-भेद चा वापर करीत आहे अशी चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत एका महिले कडून तब्बल त्यांच्याच विधानसभा क्षेत्रात ४८२०० एवढ्या मोठ्या मतांनी झालेल्या पराभवाची धास्ती घेऊन राजकीय डावपेच आखण्यात आले आहे आणि लोकसभेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून असे केल्याची चर्चा आहे.
विशेष आणि वरील शंकेला दुजोरा देणारी गोष्ट अशी की बहुतांश उमेदवारांनी स्वतःचे नाव मग वडील किंवा पतीचे नाव शेवटी आडनाव या क्रमाने अर्जामध्ये आपले नाव नोंदवले आहे, परंतु गावतुरे अनिता मधुकर आणि गावतुरे छाया बंडू या दोन उमेदवारांनी आडनाव पाहिले लिहिले आहे. हा केवळ एक योगायोग नसून एका उद्देश्यपूर्ती साठी केल्याचे राजकीय जाणकरांकडून बोलले जात आहे.
उच्च शिक्षित आणि बहुजन समाजातील उमेदवार म्हणून डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी केली होती पण कांग्रेस पक्षाने संतोष सिंग रावत यांना पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले.
डॉ. अभिलाषा गावतुरे यांचे नाव बल्लारपूर विधानसभा मतदार संघातील बल्लारपूर, चंद्रपूर, मुल आणि पोंभुर्णा तालुक्यातील प्रत्येक गावात राजकीय आंदोलने आणि सामाजिक चळवळीच्या माध्यमातून पोहोचले आहे.
डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्या लोकप्रियतेला कमी करून आणि गावतुरे या आडनावाचे एकापेक्षा जास्त उमेदवार देऊन सामान्य मतदारांमध्ये गोंधळ निर्माण करून मत विभाजन करण्याचा हा एक राजकीय डाव आहे अश्या प्रकारच्या राजकीय चर्चा बल्लारपूर विधानसभेत होत आहेत.