डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी वायगाव, निंबाळा आणि मामला परिसरातील विद्यार्थ्यांचा बस सुविधांच्या समस्येवर लक्ष वेधले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शेकडो विद्यार्थ्यांनी चंद्रपूर बस स्थानक प्रमुखांना निवेदन देऊन या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले आहे.
डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी सांगितले की, “बस स्थानकाच्या सुशोभीकरणासाठी करोडो रुपये खर्च केले जात असताना, विद्यार्थ्यांना मूलभूत बस सुविधा मिळत नाहीत ही अत्यंत खेदाची बाब आहे. वायगाव, निंबाळा आणि मामला परिसरातील शेकडो विद्यार्थी या समस्येमुळे शैक्षणिक नुकसान सहन करत आहेत.”
त्यांनी पुढे स्पष्ट केले की अपुऱ्या बस सुविधा आणि अनियमित वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांना शाळेचे तास सोडून बस पकडण्यासाठी धावपळ करावी लागते. “हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर गंभीर परिणाम करत आहे,” असे त्यांनी नमूद केले. डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी बसच्या वेळा विद्यार्थ्यांना सोयीस्कर करण्याची मागणी केली आहे.
डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी स्थानिक प्रशासन आणि बस सेवा अधिकाऱ्यांचे लक्ष या समस्येकडे वेधले गेले असून, लवकरच सकारात्मक कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.