केवळ झेराँक्ससाठी 50 कि.मी प्रवास करणारे कष्टाळू भाऊ अन् बहीणी ,जेव्हा पाड्यावरच झेराँक्स मशीन बघतात…

डॅा. जयश्री दमके
प्रतिनिधी, महाराष्ट्र
सातपुड्याच्या वसलेल्या धडगाव तालुक्यातील अत्यंत दुर्गम पाड्यांमध्ये स्वतंत्र्याच्या ७६ वर्षा नंतर अनेक लोकांनी पहील्यांदा गावात संगणक व झेराँक्स मशीन पाहीले . यंग फाऊंडेशनच्या माध्यमातून नर्मदा नदीच्या खोऱ्यातील अतीदुर्गम अश्या उडद्या व कुंड्या या पाड्यावर झेराँक्स ची व्यवस्था करण्यात आली आहे. लोक अत्यंत कुतुहलाने संगणक व झेराँक्स मशीनकडे बघत होते या भागातील हजारो लोकांना आता आपल्याच परीसरात प्रिंट काढणे शक्य झाले आहे.

सरकार विकासाचा किती ही गाजावाजा करत असले तरी धडगाव तालुक्यातील नर्मदा नदी परीसरातील अनेक दुर्गम पाडे आज ही मुलभूत सोयीसुवीधे पासून वंचित असल्याचे भयावहचित्र या भागात पाहायला मिळते. या परिसरातील अनेक भागात आजपर्यंत पक्के रस्ते , वीज, पोहचली नाही. अनेक पाड्यांपर्यंत जायला धड रस्ता ही नाही, अशा परीस्थितीत लोकांना केवळ झेराँक्स काढण्यासाठी धडगाव किंवा तोरणमाळला ४०-५० किलोमीटर चा प्रवास करून जावे लागते. परिवहनाच्या सोयी अभावी मोटरसायकलने २००-३०० रुपयाचे पेट्रोल खर्च करून जान्या शिवाय पर्याय नाही. पावसामुळे दरळी कोसळून अत्यंत धोकादायक झालेल्या घाटरस्त्या वरून जीव मुठीत घेऊन हा प्रवास करावा लागतो. शिवाय दिवसभर काम सोडून झेराँक्स काढायला जायचं म्हटले तर रोजंदारी वर पानी फेरले जाते.

अश्या विदारक स्थीत मध्ये सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली. योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक कागदपत्रे गोळा करून त्या कागदपत्रांचे झेराँक्स करुन जमा करावे लागत आहे. मात्र कुंड्या ,उडद्या ,भादल ,खापरमाळ ,भमाणे या भागात कुठेही झेराँक्स मशीन नसल्यामुळे लोकांना केवळ झेराँक्स काढण्यासाठी धडगावला किंवा तोरणमाळला जावे लागत आहे. लोकांची पावसाळ्यातील ही जिवघेणी धावपळ थांबावी या करिता यंग फाऊंडेशनने कुंड्या व उडद्या या दोन गावांमध्ये सोलर ईन्व्हर्टर बसवून, झेराँक्स मशीनची जोडणी करुन दिली आहे. त्यामुळे लोकांना आता गावातच झेराँक्स काढणे शक्य झाले आहे. सोबतच संगणक व कलर प्रिंटर ती जोडणी करून दिली आहे त्यामुळे नेटवर्क असलेल्या कुंड्या गावात ॲानलाईन काम करणे व पासपोर्ट व कलर प्रिंट काढने शक्य झाले आहे. या कामा साठी होणारी ५० किलोमीटर ची पायपीट थांबल्यामुळे लोकांनी फांऊडेशनच्या कामाचे कौतुक केले आहे.

या भागात अजूनही अनेक ठिकाणी लोकांना अशा प्रकारच्या सोलर सिस्टीम व झेराँक्स मशीनची आवश्यकता असल्याने या करिता ज्यांना शक्य असेल त्यांनी जरुर मदत करावी जेणेकरुन एका झेरॅाक्स करिता लोकांची होणारीधावपळ थांबेल. ज्यांना शक्य असेल त्यांनी ही परीस्थिती अनुभवण्यासाठी सातपुड्याच्या पाड्यांना भेट द्यावी असे आव्हान यंग फाऊंडेशन ने केले आहे.

सातपुड्यात दोन वर्षा आधी नवीन ग्राम पंचायती निर्माण झाल्या परंतू अद्यापही आवश्यक प्रक्रिया पुर्ण झाली नसल्यामुळे ग्राम पंचायत चे कार्यालय नाही संरपंचाला बसायला जागा नाही. ग्रामपंचायत चे बॅक खाते नसल्याने विकास कामांन करिता येणारा निधी आल्या पावली परत जात आहे. या कडे सरकार ने लक्ष देने गरजेचे आहे. सरकार कोणतेही असो या भागात विकास होणार नाही, कारण सरकार या भागातील आदिवासी जनते कडे नागरिक नाही तर मतदार म्हणून बघते याचा प्रत्यय या भागातील जनते निरंतर येत असल्याने विश्वगुरू भारतात आदिवासींचे स्थान काय हा प्रश्न स्थानिक जनता करित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *