भारतीय शिक्षण मंडळ, चंद्रपूरच्या अध्यक्ष पदाचे दायित्व शाम हेडाऊ तर मंत्री पदाचे दायित्व संतोष शिंदे यांच्याकडे

भारतातील 28 राज्ये आणि 700 जिल्ह्यांमध्ये काम करणारी भारतीय शिक्षण मंडळ (BSM) ही एक भारतीय संस्था आहे.

चंद्रपूर :- भारतीय शिक्षण मंडळ, चंद्रपूरच्या अध्यक्ष पदाचे दायित्व शाम हेडाऊ तर मंत्री पदाचे दायित्व संतोष शिंदे यांच्याकडे शिक्षण, संशोधन आणि सामाजिक कार्यांवर लक्ष केंद्रित करणे, भारतीय शिक्षण प्रणालीमध्ये सुधारणा करणे आणि भारतीय मूल्यांवर आधारित शिक्षण प्रणाली विकसित करणे हे ध्येय घेऊन भारतातील 28 राज्ये आणि 700 जिल्ह्यांमध्ये काम करणारी भारतीय शिक्षण मंडळ (BSM) ही एक भारतीय संस्था आहे.

1969 मध्ये भारतीय शिक्षण मंडळाची
स्थापना करण्यात आली असून या संस्थेच्या चंद्रपूर जिल्ह्याच्या अध्यक्ष पदाचे दायित्व चंद्रपुरातील प्रेरक वक्ते तथा आधुनिक केसरी या वर्तमानपत्राचे जिल्हा प्रतिनिधी असलेले शाम हेडाऊ यांच्याकडे तर मंत्री पदाचे दायित्व प्रा. संतोष शिंदे यांच्याकडे देण्यात आले आहे.
चंद्रपुरातील स्थानिक सरदार पटेल महाविद्यालयातील अब्दुल शफी सभागृह येथे नुकत्याच संपन्न झालेल्या एका कार्यक्रमामध्ये भारतीय शिक्षण मंडळाची नवीन कार्यकारणी घोषित करण्यात आली. त्यामध्ये हे दायित्व देण्यात आले असून उपाध्यक्ष पदाचे दायित्व देवानंद साखरकर, महिला गती विधी प्रमुख स्वाती घरोटे, अनुसंधान गति विभाग प्रमुख प्रा. डॉ. सचिन वझलवार, युवा गतिविधि प्रमुख दीक्षांत बेले, गुरुकुल गतीविधी प्रमुख वनिता हलकरे, कोश विभागप्रमुख वेदांत अल्मस्त तथा, शालेय शिक्षा गतीविधी प्रमुख प्रा. अनंत मल्लेलवार यांच्याकडे दायित्व देण्यात आलेले आहे.
भारतीय शिक्षण मंडळाचे सहकोश प्रमुख अजय धाक्रस यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच पार पडलेल्या या कार्यक्रमाला भारतीय शिक्षण मंडळाचे विदर्भ प्रांत अध्यक्ष डॉक्टर अखिलेश पेशवे, युवा प्रकोष्ट प्रमुख अभिषेक त्रिपाठी, विदर्भ प्रांत सहमंत्री प्रा.डॉ. प्रशांत ठाकरे आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून बोलत असतांना डॉक्टर अखिलेश पेशवे यांनी भारतीय शिक्षण मंडळ ही हरवलेला मी सापडविण्याचे कार्य करते, चार भिंतींच्या पलीकडचं शोधण्याचे कार्य भारतीय शिक्षण मंडळ करते, आपल्या शिक्षण पद्धती मधून आपला स्व हरवला होता हा स्व उमटविण्याचा प्रयत्न करणे हेच भारतीय शिक्षण मंडळाचे काम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात आपले मत मांडताना अजय धाक्रस यांनी आपल्या जगण्यात, वागण्यात, बोलण्यात भारतीयत्व दिसते का हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा असे आवाहन करत भारत हा एक संपन्न देश होता आणि म्हणूनच या देशावर अनेक आक्रमण झालेत. परंतु भारताने आपलं स्वत्व आजही जपलेलं आहे असं म्हणत आजच्या उच्च शिक्षित तरुणाईचं इंग्लंड, अमेरिकेला जाणं जेवढं कमी होईल तेवढा हा भारत देश पूर्वीसारखा संपन्न होईल असे मनोगत व्यक्त केले. खरंतर आपल्या देशाला दैदिप्यमान असा वैभवशाली इतिहास आहे. परंतू, आज ज्यांचा इतिहास नाही ते भारताच्या इतिहासाबद्दल सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या जीवनात भारतीयत्व आणा, तुमची संपूर्ण एनर्जी जर तुम्ही एका ठिकाणी फोकस केली तर तुम्ही हे संपूर्ण जग बदलू शकता. चॅट जीपीटी, गुगल, यू ट्यूब यामुळे शिक्षणाचे महत्त्व कमी होत आहे पण, शिक्षकाचे महत्व कधीही कमी होणार नाही याची काळजी घेणे हे आपल्या हाती असल्याचेही त्यांनी सांगितले. पैसे देऊन शैक्षणिक क्षेत्रात यावे लागत असेल तर शिक्षणात भारतीयत्व कसे येईल असा प्रश्नही त्यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला. आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं वागणं, जगणं, राहणं, पोशाख, आहार, या सर्व गोष्टींसह आपल्या संपूर्ण जीवनात भारतीयत्व आणा असे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.
आपल्या प्रास्ताविकातून प्रा. डॉ. प्रशांत ठाकरे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती घरोटे यांनी तर आभार संतोष शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. अनंत मल्लेवार यांच्या मार्गदर्शनाखाली निखिल बोट्टूवार, रामचंद्र श्रीरामे, डॉ. परितोष मिश्रा, गणेश उपरकर, चेतन धाबेकर, वर्षा कोल्हे आदींनी परिश्रम घेतले.


भा. शि. मंडळ, चंद्रपुर कार्यकारिणी

शैलेंद्र राय – पालक, शाखा चंद्रपूर

१. श्याम हेडाऊ – अध्यक्ष, भा. शि. मंडळ – शाखा चंद्रपूर

२. देवानंद साखरकर – उपाध्यक्ष
३. डॉ संतोष प. शिंदे – मंत्री
४. निलेश काळे – सह मंत्री
५. स्वाती उमेश घरोट – महिला गतीविधी प्रमुख
६. वर्षा कोल्हे – महिला गतीविधी सहप्रमुख
७. डॉ सचिन स. वझलवार – अनुसंधान गतीविधी प्रमुख
८. डॉ अमोल व. नांदे – अनुसंधान गतीविधी सह प्रमुख
९. दीक्षांत बेले – युवा गतीविधी प्रमुख
१०. गणेश उपरकर – युवा आयाम सह-प्रमुख
११. डॉ वेदांत अलमस्त – कोष विभाग प्रमुख
१२. वनिता के. हलकरे – गुरुकुल गतीविधी प्रमुख
१३. डॉ दिवाकर प. चौधरी – गुरुकुल गतीविधी सह-प्रमुख
१४ स्वप्नील रत्नपारखी सन्मित्र मंडल संयोजक
१५. रामचंद्र की. श्रीरामे सन्मित्र मंडल सह-संयोजक
१६. अनंता श्री. मल्लेलवार – शालेय शिक्षा गतीविधी प्रमुख
१७. निखिल बोडूवार – शालेय गतीविधी सह-प्रमुख
१८. डॉ पारितोष ल. मिश्रा – शैक्षिक गतीविधी प्रमुख
१९. आकाश श्रावणकर – शैक्षिक गतीविधी सह-प्रमुख
२०. चेतन धाबेकर – प्रचार प्रसार प्रमुख
२१. अशोक ग. गिरडकर – प्रचार प्रसार सह-प्रमुख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *