निरोप देतो देवा आज्ञा असावी ..चुकले आमचे काही देवा तर क्षमा असावी ……

गणपती निघाले,खाली झाला मखर तुमची वाट पाहु बाप्पा पुढच्या वर्षी या लवकर

वरदा महाजन
बीबीसी माझा, नांदेड

बाप्पा ,बाप्पा म्हटलं की डोळ्यासमोर समोर येते ते म्हणजे गोंडस चेहरा आकर्षक सोंड आणि बघतच रहावे असे डोळे यंदा ही बाप्पा आले आणि हे ११ दिवस कसे गेले ते समजले देखील नाही. वेगवेगळे देखावे, वेगवेगळे बाप्पा चे अशे रूप जणू काही पाहतच रहावे अशे दृश्य मग आले घरचे दीड दिवसांचे बाप्पा बाप्पा किती ही दिवसाचे असो मग तो अकरा काय आणि दीड काय तयारी तेवढीच जय्यत मग ती मोदकाची गोडी असो की मग लाडूची आरास असो अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत उत्साह हा तेवढाच वेगवेगळे खेळ घेणे मंडळाची आरती असो वा प्रसाद वितरण बाप्पा म्हणजे जणू काही स्वर्ग च मग त्या ११ दिवसाचे कधी ४,३,२ आणि आजची अनंत चतुर्दशी आली हे समजलच नाही आणि बाप्पा निघाले हे म्हणतानाच डोळे अगदी भरून आले तरीही आपण बाप्पांचे विसर्जन वियोग नाही, तर एक नवा आरंभ मानू आणि बाप्पांची कृपा आपल्यावर कायम राहुद्या असे मानू बोला गणपती बाप्पा मोरया……

आभाळ भरलं होतं बाप्पा तु येताना
आता डोळ्यांत अश्रु दाटले तू जाताना
चुक भूल पदरात घे अन् पुढच्या वर्षी लवकर ये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *