प्रा. राणी कुमरे
अहेरी (गडचिरोली) : सुरजागड प्रकल्पाचे खरे चित्र आता हळूहळू दिसु लागले असुन जनतेच्या भ्रमाचा भोपळा फूटू लागला आहे. हजारोंना रोजगार देणारा प्रकल्प अशी आभासी प्रतिमा हवेत विरुन जाऊन एक विदारक वास्तव स्पष्ट होत आहे.
प्रकल्पातील विविध विभागात काम करणार्या शेकडो कर्मचारी तरुणांनी माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराजांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. तेथे सुरु असलेल्या आर्थीक, शारिरीक पिळवणुकी बद्दल सांगीतले. तेथे सुरु असलेले शोषण, दंडेलशाही आणि दडपशाही या बद्दलच्या दबुन असलेल्या भावनांची वाट मोकळी केली. नेते आणि शासकीय यंत्रणा सगळ्यांचेच कंपनीच्या दलालीने हात माखलेले असल्यामुळे आता समस्या कोणा समोर मांडाव्या हा मोठा प्रश्न आहे. राजे अम्ब्रीशराव हेच एकमेव प्रामाणिक नेते आहेत ज्यांनी स्थानिकांच्या हिताशी कधीच तडजोड केली नाही. हे कर्मचार्यांनी अभिमानाने सांगितले आणि त्यामुळे राजे साहेबांकडे मोठ्या आशेच्या दृष्टीने बघत असल्याचे सांगितले.
राजे साहेबांनी सर्वांना धीर देत भक्कमपणे पाठीशी ऊभे राहणार असल्याचे सांगुन आश्वस्त केले. आगामी काळात सुध्दा सर्वतोपरी मदतीस तयार असल्याचे सांगीतले .त्यावर ऊपस्थित तरुणांनी सुध्दा राजे साहेबांचे नेतृत्व स्विकारुन प्रामाणिकतेच्याच पाठीशी राहणार असल्याचे शब्द दिले.